सर्वात मोठी बातमी ; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याआधीच सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीशांना….
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टातील तब्बल चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय.
कोरोनाचं देशात पुन्हा थैमान वाढू लागलंय.कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसतोय. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसतोय. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. त्यानंतर आज आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव झालाय.
कोरोनानं पुन्हा सुप्रीम कोर्टात एन्ट्री केलीय. सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीशांना कोरोनाची लागण झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, एस रवींद्र भट, जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा या न्यायाधीशांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झालंय. सुप्रीम कोर्टात वकील, पक्षकार, नागरिक यांना मास्क सक्ती करण्यात आलीय.