सर्वात मोठी बातमी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ताकारणात एक महत्वाची घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात असून राज्याचें मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे.
महाविकास आघाडीतील कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांशी या बाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येत असून आज संध्याकाळी कॅबिनेट च्या बैठकी नंतर राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.