भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

सर्वात मोठी बातमी ; सत्तासंघर्ष प्रकरणात विधीमंडळाचा मोठा निर्णय!

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना कोणाची हे ठरवण्यासाठी योग्य ते पुरावे सादर करा, अशी नोटीस देण्यात आली आहे. सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे गटाला दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. शिवसेना कोणाची हे ठरवण्यासाठी योग्य ते पुरावे सादर करा अशी नोटीस विधीमंडळ सचिवांकडून शिवसेना आणि ठाकरे गटाला पाठवण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात मंगळवारी विधीमंडळ सचिवांकडून शिवसेना आणि ठाकरे गटाला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटाकडे आठ दिवसांचा वेळ आहे. दोन्ही पक्षांकडे आपलं वर्चस्व सिद्ध करण्याची ही मोठी संधी असणार आहे. निवडणूक आयोगानं यापूर्वीच आपला निर्णय दिला आहे. आता विधिमंडळ काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आपल्या समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. शिवसेनेतील अनेक आमादारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ठाकरे गटानं या प्रकरणात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाकडून हे प्रकरण आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आलं आहे. आता या प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!