भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पश्चिम किनारपट्टीला ‘बिपरजॉय’ चक्रीवादळा धोका; ४८ तासात हे वादळ आणखी तीव्र होणार

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळा धोका; वादळाला बिपरजॉय नाव कसं पडलं? जाणून घ्या . बांगलादेशने या नव्या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव दिलं आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरुच आहे. अशामध्ये सर्वांना प्रतीक्षा लागली ती म्हणजे मान्सूनची. मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर आता हवामानात बदल झाल्याने अरबी समुद्रात बिपरजॉय नावाचं चक्रीवादळ तयार झालं आहे. या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ असे नाव देण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात खोल दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून याचे रूपांतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळात झाले. पुढील काही तासांत हे वादळ हळूहळू तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर व्यतिरिक्त कोकणातील किनारपट्टी भागात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

नाव कसे देण्यात आले?
बांगलादेशने या नव्या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव दिलं आहे. जागतिक हवामान संघटनेच्या मते, हवामानाचा अंदाज वर्तविणारे गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येकउष्णकटिबंधीय या चक्रीवादळाला एक नाव देतात. सर्वसाधारणपणे, उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना प्रादेशिक स्तरावरील नियमांनुसार नावे दिली जातात. हिंद महासागर क्षेत्रासाठी, २००४ मध्ये चक्रीवादळांचे नाव देण्याच्या सूत्रावर सहमती झाली.

८ देशांचा यामध्ये समावेश
बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड – सर्वांनी नावांचा एक संच नियुक्त केला आहे. जे जेव्हा जेव्हा चक्रीवादळ विकसित होते तेव्हा अनुक्रमे नवे दिली जातात.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
मच्छिमारांना मच्छिमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. पुढील ४८ तासांत हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ या हंगामात अरबी समुद्रात निर्माण झालेले पहिले चक्रीवादळ आहे.

हे चक्रीवादळ ८,९ आणि १० जूनला महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागांत धडकणार आहे. कोकण, गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर ८ ते १० जून दरम्यान समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे त्यामुळे या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!