चावला कुत्रा, तीन महिन्यांचा तुरूंगवास मात्र मालकाला !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रॉटवेलर जातीचा कुत्रा एका वयस्क व्यक्तीला चावल्याने कोर्टाने तीन महिन्यांचा तुरूंगवासाची शिक्षा मालकाला सुनावली आहे. तेरा वर्षापुर्वी ही घटना घडली होती.
सांताक्रुझ येथे राहणारे पेर्सी हॊरमुस्जी आणि त्यांचे नातेवाईक केर्सी इराणी वय ७२ वर्ष रस्त्यावर एका जुन्या मालमत्तेच्या वादातून एकमेकांशी भांडत असताना त्यावेळी कारमध्ये असलेल्या हिंसक मानल्या जाणाऱ्या रॉटवेलर जातीच्या कुत्र्याला त्यांचे मालक पेर्सी हॊरमुस्जी यांनी अचानक सोडल्याने त्यान या वृद्धावर हल्ला करीत त्याच्या हाताला आणि पायाला तीन वेळा चावा घेतला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता.
हे प्रकरण तेरा वर्षांनी कोर्टात उभे राहून या खटल्यात पेर्सी होरमुस्जी याना कोर्टाने दोषी ठरवले. कोर्ट म्हणाले की मालकाला त्याच्या कुत्रा आक्रमक जातीचा असल्याचे पूर्णपणे माहीती असूनही त्याने योग्य ती काळजी घेतली नाही.म्हणून त्यांना कोर्टाने तीन महिन्यांचा तुरूंगवासाची शिक्षा मालकाला सुनावली आहे.