भाजप नेते किरीट सोमय्याचा महाराष्ट्र सरकारवर धक्कादायक आरोप
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. आपल्यावर हा हल्ला शिवसेनेच्या गुंडांनी केल्याचे देखील ते म्हणाले.
किरीट सोमय्या म्हणाले की, काल खार पोलीस स्टेशन येथे माझ्यावर हल्ला झाला. तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केलेला हल्ला होता. मी संध्याकाळी पोलीस स्टेशनला कळवलं होतं. साडेनऊ वाजले होते. मी पोहोचण्याआधी सत्तर ऐंशी शिवसैनिक जमले होते. येताना मला शिवीगाळ केली. गाडी थांबवली. परत जाताना पोलिसांना सांगितलं, हल्ला करणार आहेत. पोलीस म्हणाले आम्ही जबाबदारी घेतली आहे, पण गेट उघडताच गुंडांनी हल्ला केला. पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं. हे पाप पोलिसांचं आहे. याला पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.