भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

शिवसेनेच्या ५ मंत्र्यांना भाजप हटवणार, कोणत्या मोठ्या नेत्यांन केला हा खळबळ जनक दावा ?

मुंबई ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेनेच्या तब्बल ५ मंत्र्यांना भाजप हटवणार आहे. यामध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे, असा मोठा दावा महाराष्ट्रातील भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांच्यावर जलजीवन मिशन योजनेत गैरव्यव्हार केल्याचा ठपका आहे, असाही खळबळ जनक आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

खडसे म्हणाले की, जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराचे रिपोर्ट दिल्लीमध्ये गेले असावेत, “भाजप आणि शिवसेनेतील मतभेद बऱ्याच ठिकाणी उघडकीस येत आहेत. भाजपच्या हायकमांडने महाराष्ट्रामधील शिवसेनेचे जे ५ कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना बाजूला केलं पाहिजे, अशी भूमिका घेतल्याची बातमी समोर येत आहे”, असं खडसे म्हणाले. तर हे पाचही मंत्री निष्क्रिय आहेत, असं भाजपवाल्यांना वाटतंय. एकतर भाजप कार्यकर्त्यांचं हे काम करत नाहीत. त्याचं त्यांच्याशी जमत नाही. त्यामध्ये आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. त्यांच्यावरही ठपका ठेवलेला दिसतोय, या दाव्याने मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!