ब्रेकिंग ; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, आता अंगणवाडी नाही नर्सरी
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याच्या शिक्षण क्षेत्रा साठी एक मोठी बातमी समोर येत असून अंगणवाड्यान बाबत मोठा निर्णय घेतला आहे . राज्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांचं लवकरच नर्सरीत (Nursery) रुपांतर होणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ग्रामीण भागात लवकरच ज्युनिअर केजी (Junior KG) आणि सिनिअर केजी (Senior KG) सुरु होणार आहेत. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ज्युनियर आणि सिनियर केजीचा अभ्यास कसा असणार, पुस्तक कशी होणार यावर अभ्यास करत आहे. त्यासाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरु आहे, ज्युनिअर, सिनिअर केजीचा जो अभ्यासक्रम आहे NCERT ने काही निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने पुस्तकं बनवली जातील, या पुस्तकातील अभ्यासक्रम अतिशय सोपा असेल मुलांना हसत-खेळत अभ्यास करता येईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
का सुरू केल्या अंगणवाड्या, कसं चालतं अंगणवाड्यांचं काम १९७५ साली एकात्मिक बाल विकाससेवा अंतर्गत भारत सरकारने अंगणवाड्या सुरु केल्या. बालकांमधील कुपोषणाशी लढणं हा त्यामागचा उद्देश होता. याशिवाय अंगणवाडी हे सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे. अंगणवाडी सेविकांना ‘अंगणवाडी ताई’ म्हटलं जातं. ३ ते ६ वयोगटातील मुलांच्या आरोग्यासोबतच त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणं हा देखील यामागचा उद्देश आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी आणि कुपोषणाचा दर कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली गेली.