ब्रेकिंग ; अभ्यासक्रमात नव्या विषयाचा समावेश, इयत्ता पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना “हा” विषय शिकवला जाणार
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शालेय शिक्षणात आता पहिलीपासूनच कृषी विषयाचा समावेश होणार आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली. ते दापोलीमध्ये बोलत होते. केसरकर यांनी दापोली कोकण कृषी विद्यापीठाला काही कामानिमित्त भेट दिली, त्यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली . भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना कृषीचे धडे मिळणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
भविषष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना कृषी हा विषय शिकवला जाणार आहे. आपन म्हणतो निसर्गाची सध्या मोठ्या प्रमाणात हानी होत आहे, मुलांमध्ये जर निसर्गाची आवड निर्माण करायची असेल तर कृषीला पर्याय नाही म्हणून आता पहिलीपासून कृषी हा विषय कंपलसरी करण्यात येणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे.
बोलताना ते पुढे म्हणाले की, कृषी शिक्षणासाठी नवा मसुदा तयार झाला आहे. यंदाच्या चालू वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी शिक्षकांना देखील प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. कारण बऱ्याचं शिक्षकांनी कृषी शिक्षण घेतलेलं नसतं, कोणी बीएस्सी बीएड केलं आहे, कोणी बीए बीएड केलं आहे, तर कोणी एचएससी डीएड केलं आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना देखील कृषीचं ट्रेनिंग देण्यात येणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे