भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग : अजित पवार राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह नॉट रिचेबल? चर्चेला उधाण

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. विशेष म्हणजे पक्षाचे ७ आमदारांचे फोन नोट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच अयोध्या जाणं आणि कार्यक्रम रद्द करीत अजित पवार अचानक ‘नॉट रिचेबल’ होणं या मुळे चर्चेला उधाण आले आहे.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी दुपारपर्यंत कात्रज दूध संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या.जेवण झाल्यानंतर ते केशवनगर येथील त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवानाही झाले. त्यांच्या वाहनांचा ताफा नियोजित कार्यक्रमाच्या अलीकडे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर पोहोचला होता. त्यांच्या कार मध्ये ते, त्यांचे स्वीय सहायक आणि चालक असे तिघेच होते. त्यांची कार थांबली, फोनवर बोलत असताना त्यांनी अचानक आपले कार्यक्रम रद्द केले आणि ते पोलिस बंदोबस्त सोडून आपल्या खासगी दौऱ्यावर निघून गेले.

अजित पवार कुठे गेले आहेत, याची माहिती शुक्रवारी रात्रीपर्यंत त्यांच्या निकटवर्तीयांसह पोलिसांनाही नव्हती. अजित पवार आणि पक्षातील ७ आमदार देखील नॉट रिचेबल असल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. अजित पवार आणि पक्षाचे ७ आमदारांचे फोन नोट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ते यापूर्वी २०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी असेच अज्ञातवासात गेल्याने त्यांच्या शुक्रवारच्या कृतीची चर्चा जोरदार रंगली होती.अजितदादा नॉट रिचेबल अशा बातम्यांना आणि चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!