ब्रेकिंग : पाचशे लोकांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। एका हॉटेलमध्ये तब्बल ५०० लोकांचं एकत्रित धर्म परिवर्तन केलं जात असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि धर्मांतराची प्रक्रिया थांबवली. राजस्थान मधील भरतपूर जिल्ह्यामध्ये रविवारी हा एक धर्मांतराचा प्रकार समोर आला .
रविवार दि ११ फेब्रुवारी रोजी राजस्थान मधील भरतपूर शहरातील अटल बंद ठाण्याच्या परिसरात धर्मांतराचं हे प्रकरण घडलं. एका हॉटेलमध्ये हे परिवर्तन केलं जात होतं. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, ख्रिश्चन धर्माच्या लोकांकडून सत्संगाच्या माध्यमातून धर्मांतर केलं जाणार होतं. यामध्ये पाचशेपेक्षा जास्त महिला आणि तरुणींचा समावेश होता.
विश्व हिंदू परिषेदेचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये पोहोचताच मोठा गोंधळ उडाला. जे लोक धर्मांतर करणार होते हे हॉटेलमध्ये पळून जावू लागले. कार्यकर्त्यांनी साधारण १० जणांना पकडलं. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली. दोन्ही बाजूंकडून मोठा गदरोळ झाला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अश्रूधुरांच्या नळकांड्या घेऊन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाचपेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शिवाय पाच ते सात महिला आणि तरुणींनाही अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल २० ठिकाणांवर असंच धर्मपरिवर्त केलं जात आहे.