BREAKING : एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील प्रमुख गॅस कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर 198 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झाली नाही. घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर आहेत.
व्यवसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आलेल्या कपातीनंतर व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 2021 रुपयांवर पोहोचले आहेत. कपात करण्यापूर्वी गॅस सिलिंडरचे भाव 2,219 रुपये इतके होते. गेल्या महिन्यात देखील गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. जून मध्ये गॅस कंपन्यांनी व्यवसायिक सिलिंडरच्या दारत 136 रुपयांची कपात केली होती. सलग दोन महिने व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्याने हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता हॉटेलमधील पदार्थ स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झाली नसल्याने गृहिणींमध्ये मोठी नाराजी दिसत आहे.