Breaking ; राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर “ईडी” ची मोठी कारवाई
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुंबईतून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील घरावर जप्तीची कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा खूप मोठा झटका आहे. प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून याआधी दोनवेळा चौकशी झाली आहे. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. दोनवेळा केलेल्या चौकशीनंतर ईडीने जो तपास केला त्यानंतर पटेल यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली.
ईडीचं राज्यातील धाडसत्र कायम आहे. ईडीने आता राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिलाय. राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने पटेल यांचं मुंबईतील राहतं घर जप्त केलं आहे.
प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती
प्रफुल्ल पटेल यांनी 2016 मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांची मालमत्ता 252 कोटींची होती. प्रफुल्ल पटेल यांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षांत सुमारे 188 कोटींची भर पडली आहे. पटेल यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या मालमत्ता विवरणपत्रानुसार जंगम मालमत्ता 14 कोटी 36 लाख, तर पत्नीची जंगम मालमत्ता 34 कोटी 12 लाख आणि एकत्र कुटुंबाची जंगम मालमत्ता 80 कोटी आहे.
पटेल यांच्याकडे 1 कोटीचे, तर पत्नीकडे 6 कोटी 44 लाखांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने आहेत. तर घरे, जमीन, व्यापारी जागा अशी 75 कोटींची स्थावर मालमत्ता प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर आहे. तर 104 कोटी 56 लाखांची मालमत्ता पटेल यांच्या पत्नीच्या आणि 107 कोटींची स्थावर मालमत्ता एकत्रित कुटुंबाच्या नावावर आहे. विशेष म्हणजे पटेल यांच्या नावावर एकही वाहन नाही. तसेच 14 कोटींचे दायित्व आहे.
कोण आहेत प्रफुल्ल पटेल?
प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. प्रफुल्ल पटेल चार वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. सध्या राज्यसभा सदस्य देखील आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली आहेत.