ब्रेकिंग ; राज्यात पुन्हा मास्क सक्ती! सरकारचा मोठा निर्णय
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे.त्या मुळे राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक असेल. वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. रुग्णालये, कॉलेज, शाळा या ठिकाणीही मास्क सक्ती असेल. काही दिवसांआधी मास्कमुक्तीचा निर्णय घेण्यात आला होता परंतु पुन्हा आता सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक असेल. आरोग्य सचिवांलयाकडून प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.
कुठे-कुठे मास्क बंधनकारक?
शाळा, कॉलेज,बंदिस्त सभागृह,गर्दीच ठिकाण, रेल्वे,बस,सिनेमगृहे,रुग्णालये, हॉटेल या ठीकाणी मास्क घालणं बंधनकारक आहे.
मागच्या काही दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना स्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्या जास्त वाढू नये, म्हणून सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी या नियमांचं पालन करत सहकार्य करण्याचं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे. काही दिवसांआधी मास्कमुक्तीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता कोरोना रूग्णांची सध्या वाढत असल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.