भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

आतांची मोठी बातमी : आघाडीत बिघाडी !शरद पवारांनी मतांचा कोटा बदलला,शिवसेनेत नाराजी

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यसभा निवडणुकी संदर्भात एक मोठी बातमी समोर येत असून आजच राज्यसभा निवडणुकीच्या काही तास आधी आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.ऐन वेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मतांचा कोटा बदलल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टोकाचे मतभेद झाले असल्याचं राजकीय वर्तुळातील सूत्रांनी म्हटलंय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय.

४२ मतांचा कोटा शरद पवारांनी ४४ केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले असल्याची माहिती सूत्रींनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घडमोड समोर आली असून राज्यसभा निवडणुकीच्या अवघे काही तास आधी कोटा बदलल्यानं शिवसेनेमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याचं म्हटलं जातं.

राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी मतांचा कोटा बदललाय. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना गुरुवारी मतदानाची परवानगी नाकारण्यात आली . त्यानंतर मतांचं गणित बदललं . एकूण ४२ मतं राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदावाराला लागणार आहेत. ४२ मतांचा कोटा ठरलेला असताना, तो ४४ का केला गेला, यावरुन चर्चांना उधाण आलंय.प्रफुल्ल पटेल यांचा कोटा वाढवल्यानं आता सहाव्या जागेसाठीची मतांची जुळवाजुळव करताना दगाफटका होऊ शकतो,असं जाणकारांच मत आहे.

राष्ट्रवादीची मतं शिवसेनेला न मिळाल्यास महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असं मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केलंय. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे शिवसेनेची दुसरी जागा धोक्यात आली आहे. शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीत दोन उमेदवार उभे केलेत. संजय पवार यांची थेट लढत धनंजय महाडिक यांच्या सामना होणार आहे. आपला दुसरा उमेदावर निवडून आणण्यासाठी शिवसेनेनं राज्यसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!