भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

ब्रेकिंग : गॅस सिलिंडरच्या किमतीत ‘इतक्या’ रुपयांची मोठी वाढ

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात लोकांना महागाईशी सामना करावा लागत असताना आता एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 103 रुपयांची वाढ झाल्याने बाहेर खाणाऱ्याचं बजेट आणखी वाढलं आहे.

19 किलोच्या कमर्शियस सिलिंडरच्या किमतीत 103 रुपयांची वाढ झाली आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीत मात्र आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कमर्शियल सिलिंडरच्या दरांत झालेल्या वाढीचा प्रभाव खाद्य उद्योग आणि रेस्टॉरंट व्यवसायावर दिसून येईलच,

आज 1 नोव्हेंबर पासून मुंबईत कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 1785.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी महागली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1684 रुपये होते. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1833 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी कमर्शियल सिलिंडरची किंमत 1731.50 रुपये होती. दिल्लीत आजपासून कमर्शियल एलपीजी 101.50 रुपयांनी महाग झाला आहे. कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 103.50 रुपयांनी वाढून 1943 रुपयांवर पोहोचली आहे, तर गेल्या महिन्यात त्याचा दर 1839.50 रुपये झाला होता. तर चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरची किंमत 1999.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये दर 1898 रुपये होते.

घरगुती गॅसच्या दरात बदल नाही
1 नोव्हेंबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि तो जुन्याच दरांवर कायम आहे. देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांवर नजर टाकल्यास, 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना मिळतो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!