भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्रसामाजिक

Breaking ; गॅस सिलेंडरचे दर पुन्हा महागले, आता मोजावे लागणार “इतके” रुपये!

मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। महागाईने होरपळणाऱ्या सर्व सामान्य जनतेला पुन्हा एकदा भुर्दंड बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 14 किलोच्या घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सिलेंडर घेण्यासाठी आता 1 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

महागाई काही कमी होण्याचे नाव घेत नाही. दर महिन्यात सिलेंडरच्या दरात सारखी वाढ होत चालली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत 14 KG LPG सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे.

तर मुंबईत 1052.50 रुपये मोजावे लागणार आहे. तर कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये दर झाला आहे.

1 मे रोजी सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर वाढवले होते. त्यावेळी प्रति सिलेंडर 102.50 रुपये किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्याशिवाय त्याआधी 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता हळुहळु जागतिक अर्थव्यवस्था बाहेर येत आहे. यासोबतच जगभरात उर्जेची मागणी वाढते आहे. परंतु, मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी ठोस पावलं उचलली गेली नसल्याने गॅसच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!