Breaking news : लोकसभा व विधानसभा निवडणुक एकाच वेळी?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभेसोबतच राज्यात विधानसभा निवडणूक घ्यायची का,लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून भाजपाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. इतर पक्षही निवडणुकी साठी कंबर कसून तयारी करत असून लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेसोबतच राज्यात विधानसभा निवडणूक घ्यायची का याची चाचपणी सुरू आहे. एकत्र निवडणूक घेतल्यास काय चित्र असेल या संदर्भात भाजपकडून सर्व्हे करण्यात येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काही खासगी कंपन्यांकडून याबद्दल सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती देखील मिळत असून हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर आणि पुरेशी माहिती हातात आल्यानंतर राज्यातील जनतेचा, मतदारांचा कौल काय आहे हे स्पष्ट होईल.त्या नंतर निवडणुकांबाबत पुढचा निर्णय होऊ शकतो.
भाजपच्या वतीने हे वेगवेगळे सर्व्हे सुरू आहेत. एका विशिष्ट कंपनीला हे काम देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून त्यासोबत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक घ्यायची का याची चाचपणी आता भाजपकडून केली जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसून तयारी सुरू केली आहे. त्याचसोबत विधानसभा निवडणूक घ्यायची का असा विचार करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीला सर्व्हेचं हे काम देण्यात आलं आहे. त्यांच्याकडून हा सर्व्हे पूर्ण झाल्यावर , पुरेशी माहिती हातात येईल. राज्यातील जनतेचा, मतदारांचा कौल काय आहे हे स्पष्ट होईल.