भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीय

ब्रेकिंग : वन नेशन, वन इलेक्शन! लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी? अहवाल तयार

मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। निवडणूक संदर्भात एक मोठी बातमी समोर येत असून संपूर्ण देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याची संकल्पना मोदी सरकारनं २०२३ च्या संप्टेंबर महिन्यात मांडली होती. त्याला वन नेशन, वन इलेक्शन असं नाव देण्यात आलं आहे. संपूर्ण देशात एकाचवेळी निवडणूका घेण्यासाठी मोदी सरकारनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती, या समितीनं आपला अहवाल तयार केला आहे. त्यामुळे आता देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आता वन नेशन, वन इलेक्शन समितीने दिलेला हा अहवाल पुढील आठवड्यात कायदा आणि न्याय मंत्रालय तसेच उच्चस्तरीय समितीला सादर केला जाण्याची शक्यता आहे. वन नेशन वन इलेक्शनची प्रक्रिया राबवण्यासाठी घटनादुस्ती हा सर्वात मोठा अडथळा होता. मात्र यातील सर्व अडथळे दूर करून हा अहवाल तयार करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र वन नेशन, वन इलेक्शनला आम आदमी पार्टीने विरोध केला आहे. तसेच ही संकल्पना संसदीय लोकशाही, राज्यघटनेची मूलभूत रचना आणि देशाच्या संघीय राजकारणाच्या कल्पनेला हानी पोहोचू शकते असं आपने म्हटलं आहे. ही संकल्पना त्रिशंकू विधानसभेला सामोरे जाण्यास असमर्थ आहे, तसेच यामुळे आमदार, खासदारांच्या घोडे व्यापाऱ्याला चालना मिळेल असंही यावेळी आपने म्हटलं आहे. तसेच एकाचवेळी निवडणुका घेतल्यानं बचत होणारा खर्च भारत सरकारच्या वार्षिक बजेटच्या केवळ ०.१ टक्के इतका आहे, असंही आम आदमी पार्टीन म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!