भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

ब्रेकिंग : शाळांना सुट्ट्या व अभ्यासाबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। वाढता उन्हाळा आणि हवामानात सातत्यानं होणारे बदल पाहता महाराष्ट्र राज्य प्रशासनाने आता सावधगिरीची पावलं उचलली आहेत. प्राथमिक स्तरावर उष्माघातापासून बचाव करण्यासाठी एकिकडे राज्याच्या विभागानं नागरिकांच्या हितार्थ काही मार्गदर्शक सूचना जारी केलेली असतानाच आता शाळांबाबतही मोठा निर्णय घेतला जाणार आहे. 

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीच मे महिन्याच्या सुट्टीच्या अनुषंगानं महत्त्वाचं वक्तव्य करत विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या असतील आजच शाळांना सुट्ट्या जाहीर करा असं वक्तव्य केलं. यासंदर्भातील अधिकृत माहिती शासनातर्फे जारी केल्या जाणाऱ्या एका परिपत्रकातून देण्यात येईल असंही ते म्हणाले. 

विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान अभ्यास देऊ नये, या म्हणण्यावर जोर देत त्यांनी राज्यातील शाळा १३ ऐवजी १५ जून रोजी सुरु होणार असल्याचं सांगितलं. सोबतच विदर्भात मात्र शाळा ३० जून सुरु होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

राज्यातून अवकाळीचा प्रभाव कमी होत असतानाच एप्रिल महिन्याच्या अखेरपासून उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. अशा परिस्थितीत यंदा शाळांना मे महिन्याची सुट्टी एप्रिलपासून देण्यात येत असल्याचं केसरकरण म्हणाले. शाळांतील परीक्षांचा अहवाल मागवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान या संपूर्ण परिस्थितीसंदर्भात मंत्रालयात थोड्याच वेळात बैठक होणार असल्याचं कळत आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!