राज्यात जळगावसह १८ जिल्ह्यातून लॉकडाऊन उठवला ! ५ टप्प्यात लॉकडाऊन हटवणार : सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यास 100 टक्के सूट
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यांनी राज्यातील अनलॉक (Maharashtra Unlock) संदर्भातली मोठी घोषणा केली आहे. पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे. तिथं पूर्णपणे लॉकडाऊन हटवण्यात येईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. अनलॉक, लॉकडाऊन संदर्भात 5 टप्प्यात निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, थिएटर्स, क्रीडा, शूटिंग नियमित निर्णय घेतला आहे. यात सरकारनं सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नाच्या हॉललाही परवानगी देण्यात आली आहे
पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेनं व्यवहार सुरु राहतील असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्या थिएटर्स, कार्यालयं, शूटिंग, जिम, सलून सुरु राहतील. त्यात सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे.
राज्य सरकारनं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू केले होते. त्यावेळी राज्य सरकारकडून लग्न समारंभ आणि राजकीय सभा, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले होते. लग्न समारंभास फक्त 25 जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली होती. त्याआधी केवळ 50 जणांना परवानगी होती. ती निम्मी करुन केवळ 25 जणांना लग्न समारंभास मुभा दिली होती. मात्र वडेट्टीवार यांनी केलेल्या घोषणेनंतर आता राज्यात लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमासह 100 टक्के परवानगी असेल.
पहिल्या लेवलमधील जिल्हे
औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे , वर्धा, वाशिम, यवतमाळ
दुसऱ्या लेव्हलमधील जिल्हे
अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार,
तिसऱ्या लेव्हलमधील जिल्हे
अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर
चौथ्या लेव्हलमधील जिल्हे
पुणे, रायगड
पाच लेव्हल कशा आहेत?
पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर
पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा