BREAKING : भूकंप होणार? शिवसेनेतील नाराज आमदारांची संख्या वाढली,कांग्रेस-राष्ट्रवादीशी फरकत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापण्याची अट!
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। विधान परिषद निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे सरकार संकटात आलं आहे. ठाकरे सरकारला शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडूनच आव्हान मिळालं आहे. शिंदे यांच्यासोबत ११ आमदार सूरतमध्ये असल्याची माहिती सुरूवातीला मिळत होती. मात्र नाराज आमदारांची संख्या वाढली असून शिवसेनेचे ३० ते ३५ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती मिळत आहे.एकनाथ शिंदे यांच्या गटाने राष्ट्रवादी कांग्रेस, व कांग्रेसशी फरकत घेऊन भाजप सोबत सरकार स्थापण्याची अट घातली असल्याची माहिती मिळत आहे.
उस्मानाबादेतील शिवसेनेचे उमरगा लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल आहे. आमदार चौगुले हे गेली ३ टर्म सलग सेनेचे आमदार असून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणून
ओळख जातात. सलग ३ वेळा आमदार असतानाही मंत्रिपद न मिळाल्याने चौगुले नाराज होते.चौगुले यांचे दोन्ही नंबर बंद आहेत.
बुलडाण्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमूलकर आणि बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड नॉट रिचेबल आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार संजय नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणमधील २ आमदार सोबत आहे. ठाण्यातील २ आमदार सोबत आहे, अशी माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे २५ शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.
नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती हाती लागली असून कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट नॉट रिचेबल आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे, काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची मिळत आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून या भूकंपाचं केंद्र गुजरात तर नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर आता शिवसेनेतच फुट पडतेय की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेतले प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे यांचा नाराज गट काल संध्याकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याचं कळतंय. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीलाच धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल असल्याचं लक्षात आल्यावर वर्षा बंगल्यावर याची कुणकुण लागताच सर्व आमदारांची बैठक आदेश दिले गेले. पण काही आमदार नॉट रिचेबल असल्याचं लक्षात आलं.
गुजरातमध्ये असलेले आमदार सुरतहून अहमदाबादला हलवण्याची शक्यता आहे. फुटलेल्या आमदारांना अमित शहा भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा