भावाच बहिणीवरच जडल प्रेम, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय तर घेतला, पण…..
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। असं म्हटलं जातं प्रेम आंधळं असतं प्रेमाला ना रंग असतो, ना रूप, ना धर्म…ना जातपात, ना श्रीमंत ना गरीब…पण हे प्रेम त्या पेक्षा एकदमच वेगळं आहे, या प्रेम प्रकरणाने समाज व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. भावाचं बहिणीवरच प्रेम जडलं. हे बहीण भावाचं समाजाला धरून प्रेम नव्हे तर त्या दोघांनी चक्क लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण समाज या गोष्टीला मान्यता देणार नाही घरचेही विरोध करणार अशात त्या दोघांनी धक्कादायक मोठं पाऊल उचललं.
या दोघांचं मृत्यदेह रेल्वे रुळावर पोलिसांना सापडला. रेल्वेच्या धडकेत त्या दोघांचा मृत्यू झाला संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर या दोघांच्या मृतदेहांच्या ताब्या घेण्यासाठी कोणीही यायला तयार नव्हतं. या घटनेला ९६ तास उलटून गेले तरी मृतदेह घेण्यासाठी नातेवाईक न आल्याने पोलिसांनी विचारपूस केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली.
गावकऱ्यांकडून पोलिसांना अशी माहिती मिळाली की, या बहीण भावाचे एकमेकांशी लव्ह अफेयर होते. त्यांमध्ये प्रेम संबंध होते आणि त्यांना लग्न करायचे होते. पण समाजातील विरोधाला तोंड देण्याची त्यांची हिम्मत नव्हती. त्यामुळे त्यांनी जीव द्यायचं बोलं जातं आहे. घटनेपासून अवघ्या ४ किलोमीटरवर त्यांचे नातेवाईक राहत होते. पण ९६ तास उलटून त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कोणीही पुढे आले नाहीत.
ही घटना झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील भोर बिलयापूरच्या पलानी गावातील आहे. या दोघांचा मृतदेह धौखरा हॉल्टजवळ बुधवारी पोलिसांना सापडला. पोलिसांनी माहिती दिली की, या दोघांचा मृतदेह डीप फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला आहे. पोलिसांना या मृतदेहाचं काय करावं कळतं नाही आहे. पालकांचा पत्ता असूनही ते मृतदेह घेण्यासाठी पुढे येतं नाही आहे.
नातेवाईंकाकडून एफआयआर देखील दाखल न झाल्यामुळे पोलिसांना कारवाई करता येतं नाही आहे. दरम्यान पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं की, ७२ तास वाट पाहतील जाईल. त्यानंतर या मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्यात येईल. शनिवारी ७२ तास उलटूनही कोणी आलं नाही. आता ९६ तास झाले तरीही कोणी आले नाहीत पोलिसांना गावातून मिळालेल्या माहितीनुसार गावात या घटनेसंदर्भात पंचायत होणार असून त्यात या विषयी निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस अजून वाट पाहत आहेत.