भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशीच्या आधी? आमदार बसले गुडघ्याला बांशिग बांधून, कुणाला पावणार विठूराया..

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पुन्हा राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. आषाढी एकादशीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून सर्व शिवसेना मंत्री एकत्रित विठूरायाची पूजा मुख्यमंत्र्यांसोबत करणार का? याचीही चर्चा आता जोर धरु लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावाला एक वर्षे पूर्ण झालं आहे. सुरुवातीला काही दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीच काही दिवस राज्याचा कारभार चालवला आणि नंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. यात शिवसेना आणि भाजपाच्या ९-९ आमदांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली, यानंतर आणखी आमदार मंत्री पदाची शपथ घेतील असे बोलल् जात होतं पण तो दिवस अजूनही उजाडला नाही.

दुसरीकडे युतीचे आमदार गुडघ्याला बांशिग बांधून बसलेत या आशेवर की लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल. शिंदे सरकारला वर्ष होत आलं पण मंत्रिमंडळ विस्तार काही झाला नाही. तोच आता एक नवीन चर्चा समोर आलीय आहे, ती म्हणजे आषाढी एकादशीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि सर्व शिवसेना मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत विठूरायाची पूजा करतील.

आषाढी एकादशीला राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची जास्त शक्यता वर्तविली जात आहे, कारण दोन वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीवारी केल्याने दिल्लीतून त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराकरता हिरवा कंदील मिळाल्याची खात्री लायक सूत्रांनी माहिती दिली आहे.

येत्या काही दिवसात शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा खुलासा केला जाईल आणि राज्यासह केंद्रात मंत्री पदी कोणाची वर्णी लागेल, याबाबत खुलासा केला जाईल, अशा चर्चा शिवसेनेचे मंत्री आणि आमदार खासगीमध्ये करत आहेत. यामुळे या बैठकीच्या निमंत्रणाचे वेध शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांना लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!