उत्तर महाराष्ट्रासह “या” जिल्ह्यात पावसाची शक्यता
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सध्या उन्हामुळे उष्णता वाढतअसताना दुसरीकडे पाऊसाची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 13 मे रोजी पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्येही 13 मे पर्यंत पावसाचा अंदाज आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढले काही दिवस मुसळधार पाऊस होऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. या महिन्याच्या तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बागायदारांना मोठी नुकसान होऊ शकतं. अशी वेधशाळेने म्हटलं आहे.