भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

मलिकांच्या राजीनाम्याला धार्मिक रंग,मलिकांच्या राजीनाम्याबद्दल चंद्रकांत पाटील म्हणतात….

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नवाब मलिक यांना ई़डीने अटक केल्यापासून त्यांच्या राजीनाम्यावरून राज्या पॉलिटिकल कल्ला सुरू आहे. भाजप मलिकांच्या राजीनाम्यावर अडून बसलंय. तर राष्ट्रवादी राजीनामा न घेण्यावर. नवाब मलिक हे मुस्लिम असल्यामुळे भाजप त्यांचा संबंध दाऊदशी जोडत आहे, असा आरोप आधी पवारांनी केला तर आता राष्ट्रवादी मुस्लिमांना खूश करण्यासाठी मलिकांचा राजीनामा घेत नाही असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्यांना आज कोल्हापुरात बोलताना पुन्हा राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवर जोरदार शरसंधान साधलं आहे. ऐन होळीच्या रंगात आता राजीनाम्याला चांगलेच धार्मिक रंग चढताना दिसत आहेत. नवाब मलिक यांच्याकडे सध्या अल्पसंख्याक मंत्रालय आहे. तसेच मलिक हे परभणी आणि गोंदियाचे पालकमंत्रीही आहेत.

राष्ट्रवादी राजीनामा न घेण्यावर ठाम
कालच राष्ट्रवादीने तातडीच्या बैठका घेत नवाब मलिक यांच्या खात्याचा पदभार काढून घेत असल्याचे सांगितलं. मलिक हे जेलमध्ये असल्याने त्यांच्या खात्याची कामं अडून पडली आहेत. ती कामं व्हाव्हीत यासाठी मलिक यांच्याकडील खात्याचा भार दुसऱ्या मंत्र्याकडे देणार असे जयंत पाटील यांनी सांगितले. मात्र नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, असेही स्पष्ट केले. त्यावरून आता भाजप नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत. हा जो अट्टहास आहे, ही लोकशाहीची थट्टा आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत. तसेच मग अनिल देशमुख आणि राठोड यांचा राजीनामा का घेतला? असा सवालही त्यांनी केला आहे. विशिष्ठ समाजाला खूश करण्यासाठी राजीनामा होत नाही, असा थेट आरोप यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

शरद पवारांवर खोचक टीका
तसेच चंद्रकांत पाटलांनी यावेळी इतरही विविध मुद्यावर भाष्य केले आहे. शरद पवारांच्या वक्तव्याला उत्तर देताना, युद्ध सुरू होईल तेव्हा बघू, असे पाटील म्हणाले आहेत. तर भाजप कडून काहीतरी शिका असा सल्लाही त्यांनी आमदारांना दिलाय. भाजप कडून काही शिकण्यासारखे आहे हे पवार साहेबांनी सुद्धा मान्य केलं, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!