भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ५० आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या तीन महिन्यांपूर्वी सुरत व्हाया गुवाहाटी मुक्कामुळे राज्यातील सत्तानाट्याला रंगत वळण मिळाले होते. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजपवर माघार घेण्याची नामुष्की आली. त्यातच आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक निवडणुकीसाठी आता शिंदे गटाने सावध सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व ५० आमदारांसहित गुवाहाटीला जाणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि आपले सर्व ५० आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाऊन कामख्या देवीचे दर्शन घेणार आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाचा विजय व्हावा यासाठी एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी विशेष पूजा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कामाख्या देवीवर मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी श्रद्धा आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे आपल्या आमदारांसह गुवाहाटीला मुक्कामी होते. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे यांनी सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. यावेळी देवीची पूजा करून शिंदे आमदारांना घेऊन गोव्यात आले आणि तिथून मुंबईत पोहोचले होते. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला आमदारांना घेऊन जात आहे.

कामाख्या देवीचं मंदिर आणि माहात्म्याबद्दल
हिंदूंच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कामाख्या देवीचं मंदिर हे भारतातलं एकमेव असं मंदिर आहे जिथं महिला त्यांच्या पाळीच्या काळातही दर्शन घेऊ शकतात. एरव्ही महिलांना पाळीच्या काळात देवळात जाण्यास किंवा शुभ कार्यात सहभागी होण्यास मज्जाव केला जातो. इथं दिला जाणारा प्रसादही विशेष असतो. कामाख्या मंदिराचा इतिहास
कामाख्या मंदिर भारतातल्य सर्वांत जुन्या मंदिरांपैकी एक आहे. आठव्या आणि नवव्या शतकात या मंदिराची उभारणी झाली असं मानलं जातं. इतिहासानुसार १६ व्या शतक मुघल आक्रमकांनी हे मंदिर उद्धवस्त केलं होतं. पण बिहारचे राजे राजा नर नारायण सिंह यांनी १७ व्या शतकात मंदिर पुन्हा उभारलं.

इथलं रहस्य
शक्तिपीठांपैकी महापीठ म्हणून या मंदिराची ख्याती आहे. या मंदिरात दुर्गा किंवा अंबामातेची मूर्ती नाही. इथं एक कुंड आहे आणि ते कायम फुलांनी झाकलेलं असतं. या कुंडातून नेहमी पाणी प्रवाहित होत असतं. या मंदिरात देवीच्या योनीची पूजा केली जाते. इथं मातेची योनी असल्याने तिला ही पाळी येते असं मानतात त्यामुळे तिचं हे रजस्वला रूप आहे. मातेच्या पाळीच्या तीन दिवसांच्या काळात मातेच्या दरबारात पांढरं कापड आंथरलं जातं. जेव्हा तीन दिवसांनी पाळी संपल्यावर दरबार उघडला जातो तेव्हा ते कापड लाल झालेलं असतं. हे लाल कापडच भक्तांना प्रसाद म्हणून दिलं जातं. या कापडाला अंबुवाची कापड असं म्हणतात आणि ते माता सतीच्या पाळीतील रजामुळे लाल झालेलं असतं. हे कापड, हा प्रसाद हिंदूधर्मियांसाठी पवित्र आहे.

मनोकामना पूर्ण करते कामाख्या देवी
काली आणि त्रिपुरसुंदरी नंतर कामाख्या देवी ही तांत्रिकांसाठी म्हणजे काळी जादू करणाऱ्यांसाठी महत्त्वाचं दैवत आहे. कामाख्येची पूजा भगवान शंकरांच्या नववधूच्या रूपात केली जाते. कामाख्या देवी मुक्ती देते आणि सर्व इच्छाही पूर्ण करते अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. मंदिर परिसरात भक्ताने कोणतीही इच्छा व्यक्त केली की ती पूर्ण होते असं सगळे मानतात. त्यामुळेच या मातेला इच्छा पूर्ण करणारी म्हणून कामाख्या म्हटलं जातं. मंदिराच्या शेजारीच एका मंदिरात मातेची मूर्तीही प्रतिष्ठित केली आहे. काळ्या जादूसारख्या इतरही अघोरी विद्या या मंदिरात आल्यावर सिद्ध होतात असा समज या विद्या जाणणाऱ्यांचा आहे त्यामुळे साधू आणि अघोरी विद्या जाणणारे लोक तुम्हाला इथं दिसतील. त्यांच्याशी संबंधित वस्तूही या मंदिर परिसरात दृष्टिस पडतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!