भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान..

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला ११ महिने उलटून गेले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केले आहे. ‘मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल’, असे विधान एकनाथ शिंदे यांनी केले.

आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ‘मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल’, असे सांगितले. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि या मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांना संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या ११ महिन्यांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विस्तार होईल, असं बोललं जात होतं. मात्र अद्यापही सरकारला मुहूर्त सापडलेला नाही. दरम्यान, शिवसेना आणि भाजपाचे ७-७ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!