भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

चीनची मोबाईलद्वारे हेरगिरी? गुप्तचर यंत्रणांचा सर्तकतेचा इशारा

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। चीनच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरील तणाव कायम आहे. सीमेवर चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण गुप्तचर यंत्रणांनी चिनी मोबाईल फोनबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. चीन मोबाईलद्वारे सैनिकांची हेरगिरी करत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी याबाबत सर्तकतेचा इशारा दिला आहे.

गुप्तचर यंत्रणांनी सैनिक आणि सैनिकांच्या कुटुंबियांना चिनी मोबाईल फोनबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुप्तचर यंत्रणांनी सीमेवर तैनात असलेले सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय चिनी मोबाईल फोन न वापरण्याचा इशारा दिला आहे आणि सतर्क राहण्यास सांगितलं आहे. संरक्षण गुप्तचर संस्थांनी इशारा देत सांगितलं आहे की, सैनिकांनी चिनी मोबाईल फोन उपकरणांपासून सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे.

चिनी ॲप्सवरही कारवाई
देशातील व्यावसायिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या चायनीज मोबाईल फोनमध्ये Vivo, Oppo, Xiaomi, One Plus, Honor, Realme, ZTE, Gionee, Asus आणि Infinix यांचा समावेश आहे. या आधीही, गुप्तचर संस्थांनी चिनी मोबाईल फोन ॲप्सच्या विरोधात कारवाई केली आहे. लष्करी जवानांच्या फोनवरून चिनी ॲप्स हटवण्यात आले आहेत.

संघर्ष सुरूच
भारतीय संरक्षण दलाने चायनीज मोबाईल फोन आणि चायनीज ॲप्लिकेशन्स वापरणंही बंद केलं आहे. मार्च 2020 पासून भारत आणि चीनमधील लष्करी संघर्ष वाढला आहे. दोन्ही देशांनी पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) एकमेकांविरुद्ध सैन्य तैनात केलं आहे. नुकतेच अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!