भुसावळ,कोराडी,नाशिक वीज निर्मिती केंद्रात कोळसा टंचाई, फक्त दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात कोळसाटंचाई असल्याने त्याचा परिणाम हा विद्युत निर्मितीवर होत असल्याचे पहायला मिळत आहे. वीज निर्मितीची मागणी वाढली, मात्र पुरवठा कमी असल्याने राज्यातील विविध भागात पुन्हा एकदा भारनियमन सुरू झाले आहे.
आता महाजनकोच्या वीज निर्मिती केंद्रात देखील कोळसाटंचाई निर्माण झाली आहे. कोराडी, भुसावळ, नाशिक वीज निर्मिती केंद्रात फक्त दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. तर चंद्रपूर केंद्रात सहा दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक आहे. कोळशाची आवक वाढवण्यात आली आहे, मात्र तरी देखील राज्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे पहायला मिळत आहे. कोळसा टंचाई असल्याने त्याचा मोठा फटका हा विज निर्मितीला बसत आहे.