भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

पुन्हा गोंधळ ; मराठीतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्लिश माध्यमाची प्रश्नपत्रिका

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यंदाच्या परीक्षेत बोर्डाकडून होणाऱ्या चुका काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये.महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा सध्या सुरु आहे. परिक्षेवेळी अंबेजोगाई इथे अशीच एक घटना आहे. बारावीचा कॅम्पुटर टेक्निक विषयाचा पेपर द्यायला आलेल्या मराठी मिडीयमच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्लिश मिडीयमची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला.

प्राप्त माहितीनुसार, काल म्हणजेच 27 फेब्रुवारीला बारावीचा कॅम्पुटर टेक्निक नावाचा पेपर होता. यानुसार विद्यार्थी सेंटरवर परीक्षा द्यायलाही आलेत. मात्र प्रश्नपत्रिका हातात येताच सर्वच विद्यार्थ्यांना धक्का बसला. मराठीतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्लिश माध्यमाची प्रश्नपत्रिका आली होती. यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकांना याबद्दल सांगितलं. मात्र यामुळे स्टेट बोर्डाचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

घडलेला प्रकार लक्षात येताच सेंटरवर सेंटर चालकांचा आणि स्टाफचाही गोंधळ उडाला. आता करायचं तरी काय?या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा संताप झाला , विचार केला असता सेंटर चालकांवर मराठी प्रश्नपत्रिका उपलब्ध न झाल्यामुळे शेवटी सेंटर चालकांना इंग्लीश मिडीयमचा पेपर मराठीत भाषांतर करावा लागला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना सोडवण्यास देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!