सोनिया गांधीं पाठोपाठ राज्यातील काँग्रेसचे नेते ईडीच्या रडारवर
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी चौकशी झाली. आता मुंबईत काँग्रेसचे नेते ईडीच्या रडारवार असल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते अस्लम शेख, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर नेते ईडीच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची सुत्रांची माहिती आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या या नेत्यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार आहते. यासंदर्भात उद्या मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. यामुळं काँग्रेस काँर्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत चौकशी सुरू होती. त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ईडीच्या कारवाईचा विरोध करत होते. आता त्यापैकी काही नेते ईडीच्या कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार
सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्डमध्ये मनी लाँड्रींग संदर्भात अंमलबजावणी संचालनालयानं गुरुवारी विचारपूस केली. सोमवारी पुन्हा त्यांना विचारपूस केली जाऊ शकते. गुरुवारी तीन तास सोनिया गांधी यांना विचारपूस करण्यात आली. त्यानंतर आता ईडीची नजर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांवर असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे काही मोठे नेते ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. हे काँग्रेसचे नेते कोण आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे.
कोण-कोणते नेते रडारवर
सोनिया गांधींची चौकशी झाल्यानंतर काँग्रेसनं ठिकठिकाणी ईडीच्या कारवाईचा विरोध केली. आता राज्यातील काँग्रेसचे नेते ईडीच्या रडारवार असल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते अस्लम शेख, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर नेते ईडीच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या या नेत्यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार आहेत. किरीट सोमय्या हे ईडीला यासंदर्भात माहिती पुरवतील.