कंत्राटी भरती निर्णय अखेर रद्द, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वादग्रस्त असलेला कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कंत्राटी भरतीचे पाप हे महाविकास आघाडीचे असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषेदतून केला आहे. कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला असला तरी वेगवेळ्या खात्याकडून सहा महिने, नऊ महिने किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
“मविआने काढलेला जीआर रद्द करण्यात येत आहे. पण यापूर्वी राज्यातील जे वेगवेगळी खात्यांमध्ये सहा महिने, नऊ महिने किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी कंत्राटी भरती केली जात होती. ती कंत्राटी भरती प्रक्रिया सुरूच असणार आहेत. त्यासंबंधिचे अधिकार हे त्या त्या खात्याकडे असणार आहेत.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले
मविआ सरकारने महाराष्ट्राची माफी मागावी
“मविआने आता महाराष्ट्रीच माफी मागावी लागणार आहे. कारण, महाविकास आघाडीने राज्यातील युवकांची दिशाभूल केल्याबद्दल, स्वत:चे पाप दुसऱ्यांच्या माथी मराल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी माफी मागणार नसतील तर आमच्या पक्षांना त्यांना रोज जनतेत जाऊन उघडे करावे लागेल”, असे फडणवीस म्हणाले.
कंत्राटी भरती रद्द करताना फडणवीस म्हणाले..“आमच सरकार आल्यानंतर एजन्सीचे रेट जास्त असल्याचे आमच्या लक्षात आले. कंत्राटी भरतीची सुरुवात काँग्रेसने केली आणि आता त्याविरोधात आंदोलन करत आहे. महाविकास आघाडीच्या पापाचे ओझे आमचे सरकार उचलणार नाही म्हणून कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले