CORONA: महाराष्ट्रात कोरोनाच्या दोन धोकादायक व्हेरिएंटची एंट्री, हिवाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढतील?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशात पुन्हा एकदा कोरोनाचा (New Covid Variant) फैलाव सुरू झाला असून गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,060 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची प्रकरणे आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर असली तरी, जगभरातील लोकांना झपाट्याने वेठीस धरणाऱ्या Omicron च्या BF.7 आणि XBB या उप-प्रकारांनी भारतातही धोक्याची घंटा वाजवली आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा नाव व्हेरिएंट आहे. त्याचे नाव BF.7 आहे आणि तो खूप वेगाने पसरतोय. महाराष्ट्रात आज याचे 18 रुग्ण सापडले आहेत. भारतात आधीपासून अस्तित्वात असलेले BA.4 आणि BA.5 उप-प्रकार तितके धोकादायक असल्याचे सिद्ध झाले नाही, परंतु BA.2.75 देशात पसरलेल्या बहुतेक संसर्गास जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेमध्ये BQ.1, BQ.1.1 आणि BF.7 चे निरीक्षण केले जात आहे कारण ते धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल-यूएसएच्या आकडेवारीनुसार, BQ.1 आणि BQ.1.1 दोन्ही एकूण कोरोना प्रकरणांपैकी 5.7 टक्के जबाबदार आहेत. BF.7 प्रकारात 5.3 टक्के प्रकरणे आहेत.
आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेने वेगाने पसरतोय
ब्रिटनमध्ये, BQ.X प्रकार आणि BF.7 चे निरीक्षण केले जात आहे कारण हे दोन्ही प्रकार BA.5 च्या तुलनेने कहर करू शकतात. यूकेच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीच्या मते, देशातील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये BF.7 प्रकाराचा वाटा 7.26 टक्के आहे आणि तो BA.5 पेक्षा अधिक वेगाने पसरण्याची भीती आहे. त्याच वेळी, XBB प्रकार, जो BJ.1 आणि BA.2.75 हे दोनीही व्हेरिएंट सिंगापूरमध्ये वेगाने पसरत आहे. हा प्रकार स्थानिक पातळीवर पसरणाऱ्या 54 टक्के प्रकरणांसाठी जबाबदार आहे. ही एक ढिकादायक बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारतातही पसरत आहे XBB प्रकार
भारतासाठी धोक्याची बाब म्हणजे अत्यंत संसर्गजन्य XBB प्रकार भारतातही वेगाने पसरत आहे. देशातील Sars-CoV-2 कन्सोर्टियमशी संबंधित एका शास्त्रज्ञाने सांगितले की, गेल्या आठवड्यापर्यंत भारतातील सुमारे 98 टक्के प्रकरणांसाठी BA.2.75 जबाबदार होता, परंतु आता XBB पसरू लागला आहे आणि तो महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये आहे. 20 ते 30 टक्के संसर्ग पसरला आहे तथापि, देशाच्या इतर भागांच्या तुलनेत, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगालमधील तीन मोठ्या प्रयोगशाळा अधिक नमुने गोळा करण्यात आणि चाचणी करण्यात गुंतलेली आहेत, त्यामुळे तेथे नवीन प्रकार ओळखले जात आहेत.
नवीन व्हेरिएंट किती धोकादायक आहेत
कोरोनाचे हे नवीन प्रकार नक्कीच मोठ्या प्रमाणावर संक्रमणास कारणीभूत आहेत, परंतु रूग्णांचा मृत्यू होण्याची आणि रूग्णालयांमध्ये रूग्णांना दाखल करण्याची शक्यता खूपच कमी आहे. हरियाणा येथील रिजनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. सुधांशू वरती यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “आमच्यासमोर येणारे नवीन प्रकार अधिक वेगाने पसरण्यास आणि मानवी रोगप्रतिकार शक्तीला हरविण्यास सक्षम आहेत.
देशात लस किंवा संसर्गामुळे विषाणूंविरूद्ध लोकांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे ज्याला इंग्रजीत हर्ड इम्युनिटी म्हणतात, त्यामुळे व्हायरस मानवी शरीरात प्रतिकारशक्तीनुसार स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची आणि रुग्णालयांवरचा भार वाढण्याची शक्यता सध्या तरी नाही. सध्या, कोविड-19 च्या बहुतेक प्रकरणांमध्ये, लोकांना घसा खवखवणे, खोकला आणि ताप येत आहे, जो तीन दिवसांत बरा होत आहे
हिवाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढतील का?
सणासुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी संसर्गाचा धोका अधिक आहे. आता लोकांनी मास्क लावणे बंद केले आहे, त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक बळावला आहे. पावसाळ्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढेल आणि उन्हाळ्यात कमी होईल, असे पूर्वी वाटले होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे हिवाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढतीलच याबद्दल पुराव्यानिशी सांगता येणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.