भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्रशैक्षणिक

कोरोनाचा शिक्षणाला फटका! विद्यार्थ्यांच्या भवितव्यांचं काय?
राज्यसरकार दिग्धा स्थितीत

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई (वृत्तसंस्था)।देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाची दहशत अद्याप देशवासियांवर आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे प्रत्येक सामान्यमाणसांसह श्रीमंत माणसाचे देखील राहणीमान बदलून टाकले हे नाकारता येणार नाही. कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रात सुरू असणाऱ्या कामाची गती मंदावली तर काही ठप्प झाली. मात्र अशापरिस्थितीत उद्याचं उज्वल भविष्य मानलं जाणाऱ्या शिक्षण क्षेत्र आणि व्यवस्थेत देखील गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले आणि अद्याप हा गोंधळ सुरूच असल्याचे दिसतेय. कोरोनादरम्यान, आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असे पालकांना वाटत होते तर कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक अडचणींनी त्यांना ग्रासल्याने त्यांचे आर्थिक नियोजन पूर्णतः कोलमडले होते. जरी कोरोनाची परिस्थितीत सुधारत असली तरी शैक्षणिक क्षेत्राचे झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाचा फटका विद्यार्थ्यांना बसला यामध्ये प्राथमिक-माध्यमिक शिक्षण घेत असलेले विद्यार्थी असो किंवा उच्च माध्यमिक असो.

कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आणि ते कायम आहे. नागरिकांकडून पूर्वी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन प्रमाणे आताच्या लॉकडाऊनमध्ये तितकेसे पालन होताना दिसत नाही. कोरोनाचा कहर अटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केलं मात्र त्याचा विविध क्षेत्रांवर होत असलेल्या परिणाम याची जाणीव अद्याप राज्य सरकारली नाही का? असा सवालही सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थितीत होत आहे. लॉकडाऊनचा सर्वप्रथम फटका बसला तो खासगी शिक्षणाला. खासगी शाळांची फी परवडत नसल्यामुळे पालकांनी या शाळांतून आपल्या मुलांना काढून त्यांना सरकारी शाळेत टाकण्यास सुरूवात केली. फी न परवडण्याचे कारण लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी वा कमी मिळत असलेला पगार यामुळे सामान्य नागरिकाच्या मनात राज्यसरकारचं शिक्षण क्षेत्राकडे लक्ष नसल्याचेी खंत कायम आहे. भारतीय पालकांमध्ये आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याची इच्छा आहे, मात्र सध्या देशावर ओढावले संकट आणि लॉकडाऊनला धरून बसणाऱ्या राज्यसरकामुळे ती अपूर्णच राहणार का? याचा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे.
कोरोनाच्या कहर दरम्यान सुरू ऑनलाईन शिक्षण आणि या शिक्षणाची पद्धत त्याच बरोबरीने मुलांचा असलेला प्रामाणिक सहभाग बघता मुलांचं भविष्यातील भवितव्य खरंच उज्वल असेल का? हा प्रश्न मनात येतोच. तसेच राज्य सरकारचे बदलणारे निर्णय आणि राज्यसरकारचं शिक्षण क्षेत्राकडे होणारं दुर्लक्ष यामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्यांचं काय? होणार याचा विचार नक्की करायला हवा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!