Corona : पुन्हा मास्क सक्ती? केंद्रीय मंत्री भारती पवार यांचं मोठ सूचक विधान
मुंबई, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा । चीनमधील वाढती कोरोनाची आकडेवारी लक्षात घेता भारत सरकारनेही सावत पावलं उचलण्यास सुरूवात केली असून, कालच केंद्र सरकारकडून सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना पत्र पाठवत बाधितांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेनसिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री डॉ, भारती पवार यांनी भारतातील मास्क सक्तीबाबत मोठं आणि सूचक विधान केले आहे. यामुळे राज्यासह देशात पुन्हा मास्क सक्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.
भारती पवार म्हणाल्या की, चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट मोडवर असल्याचे त्या म्हणाल्या. चीनमधील परिस्थीती लक्षात घेता याबाबत काय उपाय योजना करता येतील याबाबत आज केंद्रीय स्तरावर महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार असून, काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे पवार म्हणाल्या. वाढती कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता पुन्हा एकादा मास्क सक्तीची गरज निर्माण झाली आहे. मात्र, याहबाबतचा निर्णय बैठकीत घेतला जाऊ शकतो. त्यामुळे सामान्यांना आगामी काळात मास्क परिधान करावा लागतो का? याबाबत आज पार पडणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, भारती पवार यांनी मास्क सक्ती गरजेची असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
चीनमधील वाढती कोरोनाची प्रकरणे लक्षात घेता मंगळवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहित अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. “जपान, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कोरिया, रिपब्लिक ऑफ कोरिया, ब्राझील आणि चीनमध्ये अचानक वाढलेली कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, भारतीय सार्स-कोव्ह -2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (इन्साकोगॉगियम) च्या माध्यमातून व्हेरिएंटचा मागोवा घेण्यासाठी सकारात्मक प्रकरणांच्या नमुन्यांचे संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग तयार कराव्यात असे म्हटले आहे. यामुळे देशात पसरणाऱ्या नवीन व्हेरिएंट्सचा वेळीच शोध घेता येईल आणि त्यासाठी आवश्यक आरोग्यविषयक उपाययोजना हाती घेणे सुलभ होईल.
भारती पवार पुढे म्हणाल्या की, जगामध्ये आठवडाभरातच कोरोनाची ३६ लाख रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे. चीनमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने भारताकडून खबरदारी घेण्यात येत आहे. भारतामध्ये कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. भारताने २२० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना भारतामध्ये येऊ नये याकरता केंद्रीय पातळीवर ही बैठक घेण्यात येणार आहे.