भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्रशैक्षणिक

Corona: पुन्हा शाळा बंद होणार? शालेय शिक्षणमंत्र्यांनी केलं स्पष्ट

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शनिवारी दिवसभरात राज्या १ हजार ३९७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सर्वाधिक ८८९ रुग्ण एकट्या मुंबईत, १०४ रुग्ण नवी मुंबईत, तसंच ठाणे शहर, ठाणे जिल्हा आणि पुणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.पुन्हा राज्यात कोरोनाची लाट येते की काय?असा प्रश्न पडलाय.

१५ जूनच्या आसपास राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. अशावेळी राज्यातील शाळा पुन्हा बंद ठेवण्यात येणार का? असा प्रश्न विचारला गेला असता त्याबाबत शालेय शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी शाळेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली,कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे शाळांना खबरदारी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी शाळा पुन्हा बंद करणे योग्य नाही, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसंच सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे. सध्या मास्क सक्ती नसली तरी मास्कबाबत पुन्हा एकदा जनजागृती व्हायला हवी, असं मत गायकवाड यांनी व्यक्त केलंय.राज्य सरकारकडून नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या ५ राज्यांना पत्र पाठवली आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. राज्यात सहा जिल्ह्यांत रुग्णसंख्या अटोक्यात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि पुण्याचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही मास्क सक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नागरिकांना केलं असून
शनिवारी महाराष्ट्रात १४५७ नवे कोरोना रुग्ण आढळले ते असें –
मुंबई – ८८९ , नवी मुंबई – १०४, ठाणे शहर – ९१, ठाणे जिल्हा – २५, पुणे महापालिका क्षेत्र – ६८, पुणे जिल्हा -१०

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!