राज्यातील “या” जिल्ह्यांमध्ये आस्मानी संकट,अवकाळी पावसाचा इशारा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। काही दिवसापूर्वी राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे अनेक ठिकाणी काढणीवर आलेल्या रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. असे असतानाच पुन्हा राज्यभर अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि भोवतालच्या प्रदेशात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे मंगळवारी राज्यभर ढगाळ वातावरण होते. याचा परिणाम आजही अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
राज्यातील दक्षिण कोकण म्हणजेच ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पाऊस बरसणार आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि विदर्भात अवकाळीची अवकृपा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
किमान तीन ते चार दिवस हे पावसाचेच असणार आहेत. एवढेच नाही तर मेघ गर्जनेसह पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महिन्याभरापासून होत असलेल्या वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा आंबा फळपिकावर झाला असून पुन्हा दक्षिण कोकणातच अधिकचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.