भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

कच्च्या तेलाचे भाव भडकले, पेट्रोल-डिझेल 8 रुपयांपर्यंत महागणार?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जागतिक स्तरावर युद्धज्वर आता वाढला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या आयुधांचा वापर करण्यात येत आहे. आता युरोपसह अमेरिकेची रशिया आणि ओपेक संघटनांनी दमकोंडी केली आहे. कच्चा तेलाचे उत्पादन घटवल्याने जगावर महागाईचे संकट ओढावले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल (Crude Oil) कडाडले आहे. जगातील तेल उत्पादक देशांची संघटना OPEC ने कच्चा तेलाच्या उत्पादनात कपात केली. तर रशियाने यापूर्वीच तेल कपातीचे शस्त्र उगारले होते. आता चीनमध्ये इंधनाचा खप वाढल्याने कच्चा तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्याचा भारतासह अनेक देशांना फटका बसण्याची शक्यता आहे.हा निर्णय महागाईला आमंत्रण देणारा असून पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे.

कंच्च्या तेलाचा भडका
केंद्र सरकारने गेल्या वर्षी भारतात 22 मे रोजी कर कपात केली. तेव्हापासून इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलची (WTI Crude Oil) किंमत 81.13 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 85.44 डॉलर प्रत‍ि बॅरलवर पोहचले.

पेट्रोल-डिझेल 8 रुपयांपर्यंत महागणार
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ओपेक देशांनी 2 दशलक्ष बॅरल उत्पादन घटवले होते. आता ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज म्हणजेच ओपेक आणि रशियाने रविवारी उत्पादनात कपात केली. प्रत्येक दिवशी 1.16 दशलक्ष बॅरल (bpd) उत्पादन घटविण्याचा निर्णय या देशांनी घेतला. परिणामी भारतात पेट्रोल-डिझेल 8 रुपयांपर्यंत महागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उत्पादन घटवले

  • ओपेक आणि रशियाचा कच्चा तेलाच्या उत्पादनात कपातीचा निर्णय
  • 1 दशलक्ष कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्यात येईल
  • सौदी अरब प्रति दिवस 5 लाख बॅरल कपात करणार
  • इराक प्रति दिवस 211,000 बॅरल कच्चा तेलाचे उत्पादन घटविणार
  • संयुक्त अरब अमिरात 144,000 बॅरल प्रति दिवस कपात करणार
  • कुवेत 128,000 बॅरल तर अल्गेरिया 48 हजार बॅरलचे उत्पादन घटविणार
  • ओमानने 40,000 हजार बॅरल प्रति दिवस कपातीचा निर्णय घेतला आहे.
  • त्यामुळे ब्रेंट क्रूड ऑईलच्या भावात 6 टक्के वाढ झाली
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!