आतांची बातमी ; मोदी सरकारची मोठी घोषणा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने तेल कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने तेल कंपन्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. महागड्या गॅसपासून दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत तेल कंपन्यांना 22 हजार कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने यापूर्वी 30 हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली होती. एलपीजीच्या किरकोळ विक्रीतून तेल कंपन्यांचे नुकसान होतंय. हा तोटा भरून काढण्यासाठी सरकारकडून हा दिलासा दिला जात आहे.
घरगुती गॅसचे दर जैसे थे
याच महिन्यात तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 25.50 रुपयांनी कमी केली होती. त्यानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यवसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1 हजार 885 रुपयांवरून 1 हजार 859.50 रुपयांवर आली होती. या वर्षी जूनपासून आतापर्यंत एकूण 494 रुपये 50 पैसे प्रति सिलेंडरच्या किमतीत कपात झाली आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या घरगुती गॅसची किंमत 1 हजार 53 रुपये प्रति सिलेंडर आहे.