भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्र

खाकी वर्दीत नाचणाऱ्यां महाराष्ट्र पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. यापुढे महाराष्ट्र पोलिसांनी खाकी वर्दी घालून नाचू नये, अशा स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अनेक पोलिसांचे नाचतानाचे व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. पोलिसांनी मिरवणुकीत नाचणं कितपत योग्य? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर अखेर पोलीस महासंचालकांकडून या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेतली असल्याचं दिसून आलं आहे.

राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातून महत्त्वपूर्ण सूचना पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना जारी करण्यात आल्यात. त्यानुसार यापुढे खाकी वर्दीत किंवा गणवेशात पोलीस नाचताना दिसले, तर त्यांची काही खैर नाही. वर्दीत कुणीही नाचू नये, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्यात.

गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त राज्यभर लावण्यात आला होता. सलग ड्युटी करुन थकलेल्या पोलिसांचा उत्साह मिरवणुकीतल्या ठेक्यानं वाढवला, असा एक सूर सोशल मीडियातील चर्चेत उमटला होता. तर दुसरीकडे कर्तव्यावर असताना मिरवणुकीमध्ये पोलिसांनी नाचणं अयोग्य असल्याचंही काही जणांचं म्हणणं होतं.

फक्त मुंबईतच नव्हे तर पुणे, कोल्हापूरमध्ये पोलिसांनी गणेश मिरवणुकीत सहभाग घेतल्याचं दिसून आलं होतं. इतकंच काय तर ढोल वाजवणं, वैयक्तिक पातळीवर भाषणं करणं, असे प्रकारही सोशल मीडियात व्हायरल झाले होते.

फेसबुक आणि व्हॉट्सअपवर पोलिसांचे मिरवणुकीतले नाचतानाचे, ढोल वाजवतानाचे, वैयक्तिक पातळीवर भाषणं करतानाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यावरुन वाददेखील उफाळून आला. अखेर या सगळ्या प्रकाराची पोलीस खात्याकडून गंभीर दखल घेण्यात आलीय. आता राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयतूनकडून अधिकृत पत्रक जारी करत पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच खाकी वर्दीत नाचू नका, अशा सूचना मुंबई पोलिसांना अतिरिक्त पोलिस महासंचालकांनीही दिल्या होत्या. गणवेशात नाचताना आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. दरम्यान, आता राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातूनच सर्व पोलिसांनी शिस्त पाळण्याच्या आणि कर्तव्यावर असताना गणवेशात नाचू नये, असं सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!