राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी ,दि. 12 रोजी पवारांचा वाढदिवस झाला. त्यानंतर आज हा धमकीचा फोन आल्याने खळबळ माजली आहे.
देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन ठार मारणार असल्याचे धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिने फोनवर म्हटले आहे. शरद पवारांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सिल्व्हर ओक येथील त्यांच्या घरी अज्ञात व्यक्तीने फोन करुन धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शरद पवार अधिवेशनासाठी दिल्लीला गेले आहेत. शरद पवारांचा सोमवारी वाढदिवस झाला. त्यानंतर आज पवारांना जीवे मारण्याची धमकीचा फोन आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.