भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

महाविकास आघाडीचा पराभव तो जिव्हारी लागल्यासारखा- एकनाथ खडसे

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत चांगली फिल्डिंग लावूनही शिवसेनेला मोठा पराभव सहन करावा लागला. महाविकास आघाडीच्या सर्व गणितांना फोल ठरवत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिकांना विजय मिळवून दिला. त्यामुळे शिवसेनेला चांगलाच दणका बसला. जरी हा पराभव शिवसेनेचा असला तरी महाविकास आघाडीच्याही जिव्हारी लागल्यासारखा आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय.

आता दुर्लक्ष करता काम नये – एकनाथ खडसे
“राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बरंच काही शिकलो. जो ओव्हरकॉन्फिडन्स होता, किंवा ज्याप्रमाणे दुर्लक्ष झालं ते आता दुर्लक्ष करता काम नये, ही एक शिकवण आम्हाला त्यातून मिळाली. मात्र, शेवटी पराभव हा पराभव असतो. तो शिवसेनेचा जरी झाला तरी महाविकास आघाडीचा पराभव म्हणून तो जिव्हारी लागल्यासारखा आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला. मात्र, विधानपरिषदेला ताकही फुंकून प्यावं लागण्याची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय. आज अंबरनाथमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच, “आता विधानपरिषदेला दूध पिण्याच्या आधी ताकही फुंकून प्यावं लागतं, तशाप्रकारे आता विधानपरिषदेची तयारी करत असताना प्रत्येक गोष्ट तपासून आणि विश्वासाने करण्याची आवश्यकता आहे”, असं खडसे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!