भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

आठवड्याभरात जमा करा २००० च्या नोटा, त्या नंतर २००० ची नोट आपल्याकडे आढळल्यास…?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। २००० रुपयांची नोट आरबीआय ने जमा करण्यासाठी सांगितले आहे. यासाठी अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२३ देण्यात आली आहे. पण जर अजूनही तुम्ही २००० रुपयांची नोट बँकेत जमा केली नसेल तर तुमच्याकडे अजूनही एक आठवडा आहे. अजूनही २४० अब्ज रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. आरबीआयच्या माहितीनुसार, १ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार, चलनातून २,००० रुपयांच्या एकूण ९३ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत. RBI ने १९ मे २०२३ रोजी दोन हजार रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा कराव्यात किंवा त्या इतर मूल्यांच्या नोटांसह बदलून घ्याव्यात.

३० सप्टेंबर नंतर दोन हजाराची नोट आपल्याकडे आढळली तर काय होईल.
नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर २००० रुपयांची नोट चलनात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. पण मे महिन्यात आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. लोक बँकेत जाऊन त्यांच्या खात्यात २००० रुपयांची नोट जमा करू शकतात. नोटा कोणत्याही बँकेत बदलता येणार आहेत. आरबीआयसह देशातील सर्व बँकांमध्ये नोट बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. २००० रुपयांची नोट बँक खात्यात जमा करण्यासाठी केवायसी फॉर्म आवश्यक असू शकतो.

२००० हजार रुपयांची नोट जमा नाही केली तर?
३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांची नोट बदलून न घेतल्यास काय होईल, हा प्रश्न अनेकांना आहे. तुमची २००० रुपयांची नोट ३० सप्टेंबरनंतर फक्त एक कागद राहिल का? ३० सप्टेंबरनंतर ती बँकांमध्ये जमा करता येणार नाही. देवाणघेवाणही करता येणार नाही. ती फक्त आरबीआयमध्ये बदलता येईल. तुम्ही ती वेळेत का बदलून घेतली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागू शकते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!