भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणासाठी अॅक्शन मोड मध्ये

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यापार्श्वभूमीवर काल शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला. तसेच पहिल्याच दिवशी त्यांनी तातडीनं अॅक्शन मोडमध्ये येत, ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक घेतली.

फडणवीसांनी बोलावलेल्या या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच काही भाजपचे नेते मंडळी उपस्थित होती. त्यामुळं फडणवीस पुन्हा एकदा जोमानं कामाला लागले आहेत. याद्वारे त्यांनी महाविकास आघाडीतील जे नेत्यांना जणू एक प्रकारे संदेश देण्याचं काम केलं.

विरोधीपक्षात असताना फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेतील होती. मागील मविआ सरकारमध्ये ओबीसी आरक्षणामुळं मोठा पेच निर्माण झाला होता. सुप्रीम कोर्टानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानं ते टिकवण्यासाठी मविआ सरकार कुठेतरी चाचपडताना दिसत होती. पण आता केंद्रात आणि राज्यातही भाजपच सरकार आल्यानं ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटतो का? हे पहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!