भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा
कोरोनाची लागण

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। विधानसभा विरोधी पक्षनेते व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र काळजी करण्याचे काही कारण नाही. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये असून, घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहे. माझ्या जे संपर्कात आले आहेत, त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते. आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान फडणवीस यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी आपल्या सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!