भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

आज फैसला होणार धनुष्यबाणाचा? निवडणूक आयोगाची मोठी कसोटी

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।लेखी म्हणणं मांडण्याची मुदत आज संपल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आज निकाल देण्याची शक्यता आहे. शिवसेना फूटीनंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यामध्ये शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून शिवसेना पक्षासह चिन्हाची मागणी केली जात आहे. सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात दोन्ही गटाकडून म्हणणं मांडले जात आहे. संपूर्ण देशाचे लक्ष हे आजच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागून आहे. निवडणूक आयोगासमोर आज दोन्ही गट लेखी म्हणणं मांडणार आहे. प्रत्यक्ष युक्तिवादानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटाच्या वकिलांनी आत्तापर्यंत केलेला युक्तिवाद बघता यामध्ये पक्षाचे नाव आणि चिन्हा गोठवलं गेलं आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याबाबत संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून अआहे.

सुप्रीम कोर्टात सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप झालेला नाही, त्यामुळे शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला याबाबतचा निर्णय देतांना निवडणूक आयोगाची मोठी कसोटी लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सत्तांतर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय हा अतिशय महत्वाचा मानला जात असून निकाल राखून ठेवला जाण्याची शक्यता कायदेतज्ज्ञ व्यक्त करत आहे. निवडणूक आयोगाच्या समोर शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी केलेला युक्तिवाद बघता धनुष्यबाण चिन्ह कुणाला याबाबत स्पष्टता येत नाही. निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यन्त तारीख पे तारीख सुरू आहे.

आजची सुनावणी बघता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल ऐतिहासिक असणार आहे. शिंदे गटाकडून महेश जेठमलाणी तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हे दोन्ही वकील बाजू मांडत आहे. दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे संख्याबळ बघता दोन्ही गटाने धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!