शिंदे-फडणवीस सरकारकडून रेशनकार्ड धारकांना दिवाळी भेट
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दिवाळी सणात गोरगरिबांसाठी दिलासा देण्यासाठी शिंदे सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अवघ्या १०० रुपयांत एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि तेल दिवाळीच्या सणासाठी मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशासह महाराष्ट्रात दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या सणाला घरोघरी गोडधोड आणि फराळ करण्याची पद्धत आहे. हा सण गोरगरीबांनाही साजरा करता यावा यासाठी सरकारनं हा पॅकेजचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील ७ कोटी कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,”आज आमच्या कॅबिनेटने खूपच महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिवाळीनिमित्त १ लाख ६२ हजार रेशनकार्ड धारकांना म्हणजेच ७ कोटी लोकांना साखर, रवा, चनाडाळ आणि तेल याचा एक पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.