ड्रग्स माफिया ललित पाटील याचे धक्कादायक खुलासे, कुणा-कुणाचा होता वरदस्त?अनेक बडे मासे गोत्यात?
मुंबई ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। काल बंगळुरूमधून ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला साकीनाका पोलिसांनी कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत कोठडी दिली आहे. पोलिसांनी ललित पाटील याची काल कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने अनेक मोठं मोठे धक्कादायक खुलासे केले . त्यामुळे अनेक बडे मासे गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ललित पाटिलला कुणा कुणाचा वरदहस्त होता? कोण-कोण त्याला मदत करायचं? याची सर्व माहिती समोर येण्याची शक्यता असून त्यामुळे त्या माहितीतून अनेक बडे मासे गोत्यात येण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.
काल पोलिसांनी ललित पाटील याची कसून चौकशी केली. त्यात त्याने पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती दिली आहे.पैशाच्या जोरावर ललित पाटील हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करत असल्याचं त्याच्या चौकशीतून उघड झालं आहे. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना तो सातत्याने पैसे देत होता. ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत होता आणि ससूनच्या बाहेर जाऊन बैठका घ्यायचा अशी माहितीही ललितने पोलिसांना दिल्याची माहिती मिळत आहे .
दीड तासात येतो म्हणाला अन्…
ललितवर नजर ठेवण्यासाठी ससूनमध्ये पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. या तैनात पोलिसांना तो पैसे द्यायचा. ससूनच्या बाहेर अनेकदा त्याचा भाऊ भूषण पाटीलला तो भेटायचा, अशी माहितीही या चौकशीतून समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं. ज्या दिवशी तो ससूनमधून फरार झाला त्या दिवशी दीड तासात परत येतो असं सांगून तो बाहेर पडला आणि फरार झाला असल्याची धक्कादायक माहितीही त्याच्या चौकशीतून समोर आली आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणात डॉक्टर आणि पोलीस सर्वच गोत्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ललित पाटीलला कुणाचा राजकीय वरदहस्त होता का? त्याला बाहेरून कोण मदत करत होतं याची चौकशी सुरू आहे. तसेच त्याच्या संपर्कात कोण कोण होतं? त्याला ससूनमध्ये भेटायला कोण कोण यायचं? त्याच्याकडून कुणा कुणाला हप्ते जायचे? याचीही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ललित पाटीलचे दोन सहकारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. या दोन्ही सहकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी पुणे पोलीस मुंबईत आले आहेत. या दोघांचा पुणे पोलीस लवकरच ताबा घेणार असल्याचं सांगितलं गेलं.
या आधी ललित पाटील हा राजकीय कार्यकर्ता होता. नंतर तो काही गुंडाच्या संपर्कात आला. त्यानंतर तो ड्रग्जच्या धंद्यात आला. २०२० मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. सातत्याने डॉक्टरांना मॅनेज करून तब्येत खराब असल्याचा अहवाल तो कोर्टात सादर करायचा, अशी माहितीही मिळत आहे. पोलिसांच्या चौकशीत आणखी काय काय नवीन उघड होते हे समोर येईलच.