भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

पुन्हा भूकंम्प होणार? उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्र्यांची थेट खुली ऑफर, भाजपची दारं कायम खुली

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या दहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला. या भूकंपामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन राज्यात सत्तापरिवर्तन घडवून आणलं. पण गेल्या दोन दिवसांपासूनच्या घडामोडी वेगळ्या घडताना दिसत आहेत. त्याला कारण म्हणजे शिवसेनेची वादग्रस्त ठरलेली जाहिरात. खरंतर त्याआधी कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात संताप व्यक्त केला. त्यानंतर काल वृत्तपत्रात छापून आलेल्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता अधिक असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे युतीत पुन्हा वाद उफाळून आला. त्यानंतर आता भाजपच्या बड्या नेत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिली आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली आहे. ते मोदी@9 महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. “उद्धव ठाकरे यांना जर भाजपसोबत यायचं असेल तर त्यासाठी त्यांना भाजपची दारं कायम खुली आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करावी. आम्ही उद्धव ठाकरेंकडे जाणार नाहीत”, असं मोठं वक्तव्य केशवप्रसाद मौर्य यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात गेले. त्यांनी खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली”, अशी टीका केशवप्रसाद मौर्य यांनी केली.

भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर?
शिवसेना आणि भाजप ही पारंपरिक युती आहे, असं दोन्ही पक्षांकडून सांगितलं जातं. पण २०२४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटल्याचं बघायला मिळालं होतं. पहिल्यावेळी युती तुटल्यानंतर पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र आले होते. दोन्ही पक्षाचे नेते राज्यात मंत्री होते. तर २०१९ च्या निवडणुकीनंतर हे दोन्ही मित्र पक्ष टोकाचे शत्रू बनले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. पण अडीच वर्षात हे सरकार कोसळलं.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनीच हे सरकार पाडत पक्षाचं थेट विभाजन करुन टाकलं. या कामात एकनाथ शिंदे यांना भाजपने साथ दिली. पण आता शिंदे गट आणि भाजपातही वाद होताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि ठाकरे एकत्र आले तर आणखी वेगळ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. विशेष म्हणजे त्यावेळी खरी शिवसेना कुणाची?, शिंदे गट कुठे जाणार? असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. तसेच उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी आज केलेलं विधान हे शिंदे गटावर दबाव आणण्यासाठी तर नाही ना? अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!